कर्णधार म्हणून रिषभ पंत करतोय या २ मोठ्या चुका, वेळीच सावरलं नाहीतर ५-० फिक्स समजा..

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत (India vs South Africa) दोन हात करतोय. ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. मात्र या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. तर मालिका सुरू होण्यापूर्वीच केएल राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी रिषभ पंतला देण्यात आली आहे. रिषभ पंतकडे (Rishabh pant) भविष्यातील कर्णधार म्हणून पाहू जाऊ लागले आहे. मात्र तो चाचणी परीक्षेत नापास झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारतीय संघाचं नेतृत्व करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी मिळाल्यानंतर चुका करणं अपेक्षित नसतं. मात्र रिषभ पंत एकच चूक पुन्हा पुन्हा करतोय. ज्यामुळे भारतीय संघाला एकदा २०० धावा तर दुसऱ्या सामन्यात १४८ करूनही पराभवाचा सामना करावा लागला.

नेतृत्व करताना होतोय रिषभ पंतचा गोंधळ

रिषभ पंत गेल्या २ हंगामांपासून आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतोय. या संघाचे नेतृत्व करताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यावरून अनेकांना असे वाटू लागले होते की, भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी तो पात्र आहे. मात्र भारतीय संघाची जबाबदारी मिळताच त्याचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याला कठीण परिस्थितीत नेमकं काय करावं, हे सुचत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हाय व्होल्टेज परिस्थिती असते. अशा परिस्थितीत एमएस धोनी सारखं शांत राहून योग्य निर्णय घेणं महत्वाचं असतं.

फिरकी गोलंदाजांचा चुकीचा वापर..

रिषभ पंतला अनुभवी गोलंदाजांचा योग्य वापर कसा करावा हे अजूनही जमत नाहीये. पहिल्या टी -२० सामन्यात तो चुकीच्या वेळी युजवेंद्र चहलला गोलंदाजी देत होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना त्याचा फायदा होत होता. चहलच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी केली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात देखील पंतने तिच चूक केली. यावेळी गोलंदाज चहल नव्हे तर अक्षर पटेल होता. कुठला फलंदाज आला की, कुठल्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यायची याची पारख कर्णधाराला असायला हवी. मात्र रिषभ पंत चुकीच्या वेळी फिरकी गोलंदाजांना गोलंदाजी देतोय, परिणामी दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकी गोलंदाजांवर तुटून पडत आहेत.

रिषभ पंत हा आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अशात भारतीय संघात जसप्रीत बुमराह,दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्यासारखे अनुभवी खेळाडू असताना रिषभ पंतला संघाचे कर्णधारपद देणं कितपत योग्य आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required