computer

रोहित शर्माने धोनीलाही मागे टाकत हा रेकॉर्ड केलाय...

सचिन तेंडुलकरला एकदा विचारण्यात आले होते, त्याचे विक्रम मोडण्याची क्षमता असलेला भारतीय खेळाडू त्याला कोण वाटतो? त्यावर उत्तर देताना सचिनने विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचे नाव घेतले होते. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा हे दोन्ही खेळाडू अगदी नवखे होते. पण सचिनचा अंदाज खरा ठरवत दोन्ही खेळाडू एका मागोमाग एक विक्रम करत आहेत.

विक्रम करण्यासाठी कुठल्या स्पर्धेचे त्यांना ओझे नसते. रोहित शर्माने हे आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरू झाल्याबरोबर सिद्ध केले आहे. रोहित शर्माच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामना जिंकत मुंबई पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचली आहे. त्याच बरोबर रोहितने स्वतःच्या नावावर अजून दोन विक्रम केले आहेत.

रोहितने २५ चेंडूंवर ३२ धावांची छोटी खेळी केली. यात त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने जेव्हा पहिला षटकार मारला तेव्हा तो आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनीच्या बरोबरीला आला, तर दुसरा षटकार मारून त्याने धोनीलाही मागे टाकले. आता तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर आता २१७ षटकार आहेत. 

रोहित शर्माच्या पुढे आता सिक्सर किंग ख्रिस गेल आणि शानदार आफ्रिकन बॅट्समन एबी डिव्हीलीयर्स आहेत. ख्रिस गेलच्या नावावर तब्बल ३५१ षटकार आहेत तर एबीडी २३७ षटकारांसहित दुसऱ्या स्थानावर आहे. 

त्याचबरोबर रोहितने अजून एक विक्रम केला आहे. कॅप्टन पदावर असताना IPL मध्ये ४,००० धावा पूर्ण करणारा रोहित हा एकमेव खेळाडू ठरला आहे. सध्या त्याच्या नावावर एकूण ५३२४ धावा आहेत. त्याचा खोऱ्याने धावा ओढण्याचा वेग बघता तो लवकरच या यादीत देखील टॉप करेल यात शंका नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required