ऑस्ट्रेलियाला पाणी पाजणाऱ्या दादाच्या नावाची चक्क बिअर तिथे मिळते??

'दादा' सौरव गांगुलीचा आज वाढदिवस! आज भारतीय क्रिकेट यशाच्या शिखरावरआहे याचे बरेचसे श्रेय सौरव गांगुलीला जाते. भारताला जिंकण्याची सवय लावली ती दादा म्हणजे सौरव गांगुलीने. म्हणूनच लोक त्याच्यासाठी वेडे होतात. आयपीएलमध्ये जेव्हा कोलकाताच्या टीममध्ये त्याचे सिलेक्शन झाले नव्हते, तेव्हा बंगाली लोकांनी आयपीएलवर बहिष्कार टाकला होता. एवढी लोकप्रियता आहे राव दादाची!! 

एकेकाळी जगज्जेत्या असलेल्या ऑस्ट्रेलियाला अंगावर घ्यायला सुरुवात मुळात गांगुलीने केली. गांगुलीने ऑस्ट्रेलियासारख्या त्यावेळी अजिंक्य समजल्या जाणाऱ्या टीमला आपण हरवू शकतो ही हिम्मत आपल्याला दिली. मग असा गांगुली त्यांना कशाला आवडेल राव!! पण फॅन फॉलोईंग कधीच एकतर्फी नसते. त्यामुळे जसे भारतात त्याचे फॅन आहेत, तसेच ऑस्ट्रेलियात पण आहेत. 

स्रोत
अशाच एका सौरव दादाच्या चाहत्याने ऑस्ट्रेलियात  स्पेशल सन्मान म्हणून चक्क एका बियरला गांगुलीचे नाव दिले आहे. ऑस्ट्रेलियात हा खूप मोठा सन्मान समजला जातो मंडळी!! त्या बियरचे पूर्ण नाव आहे ' फेरल गांगुली मँगो लासी' असे आहे. शॉर्टमध्ये त्या बियरला गांगुली बियर असे म्हटले जाते. ही मँगो लस्सी  IPA नावाची बियर, ताजा आमरस, वेलची, लॅक्टोज यांचा वापर करुन बनवण्यात आली आहे. iकार्बोज बियर बार यांच्या मदतीने फेरल ब्रुअरीने ही बियर बनवली आहे.  

एका ऑस्ट्रेलियातील ट्विटर यूजरने म्हटलंय की ज्याप्रकारे गांगुली ऑस्ट्रेलियन टीमला पाणी पाजायचा, त्यावरून तो इथे कुणाला आवडत नसावा असे वाटायचे. पण गांगुलीचे सगळीकडे सारखेच चाहते आहेत हे सिद्ध झाले. 

ऑस्ट्रेलियाच्या कुठल्याही बारमध्ये ही बियर सहज उपलब्ध होते राव!! आपल्या देशात क्रिकेटर्सची पूजा केली जाते. पण परदेशातसुद्धा त्यांना मोठा सन्मान मिळतो हे आज गांगुलीच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले. आज गांगुलीचा वाढदिवस आहे. त्यानिमित त्याला बोभाटाकडून शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required