वडील चालवतात पानाचे दुकान; मुलाने कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिरंगा फडकवत रचला इतिहास..

सध्या बर्मिंगहॅममध्ये (Bermingham) कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Common wealth games 2022) स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत सांगलीत राहणाऱ्या २१ वर्षीय संकेत महादेव सरगरने (Sanket sargar) भारताला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याने ५५ किलो वजनी गटात, दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक मिळवले. महाराष्ट्रातील सांगलीत राहणाऱ्या संकेतने क्लीन अँड जर्कमध्ये १३५ किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळवले आहे. तीन वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या संकेतच्या वडिलांचे पानचे दुकान आहे. अतिशय संघर्ष करत, संकेतने हे यश मिळवले आहे.

संकेत महाराष्ट्रातील सांगलीमध्ये राहतो. वेटलिफ्टींग सह तो वडिलांना मदत देखील करतो. त्यांचे सांगलीत पानाचे दुकान आहे. हे दुकान चालवण्यात तो आपल्या वडिलांना मदत करतो. त्याचं स्वप्न आहे की, त्याच्या वडिलांनी आता घरी बसावं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सिंगापूर वेटलिफ्टिंग इंटरनॅशनलमध्ये संकेतने २५६ किलो (स्नॅचमध्ये ११३ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १४६ किलो) वजन उचलत राष्ट्रकुल आणि राष्ट्रीय विक्रम मोडला होता.

कॉमनवेल्थ गेम्स सुरू होण्यापूर्वीच संकेतने म्हटले होते की, जर त्याला या स्पर्धेत जेतेपद मिळवता आले तर तो त्याच्या वडिलांची मदत करेल. तो लहानपणापासूनच आपल्या वडिलांना मदत करतो. त्याने म्हटले होते की, "'माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप त्रास सहन केला आहे. मला फक्त त्यांना आनंदी बघायचं आहे. याशिवाय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हे माझे ध्येय आहे."

संकेतची गेल्या वर्षी एनआयएस पटियाला येथे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. तो सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत आहे . संकेतने खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० मध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required