CWG 2022: नीरज चोप्रा, पी. व्ही.सिंधू सह भारतीय खेळाडू केव्हा उतरणार मैदानात? पाहा कॉमनवेल्थ गेम्सचे संपूर्ण वेळापत्रक...

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Bermingham common wealth games 2022) स्पर्धेची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. भारतीय खेळाडू देखील या स्पर्धेसाठी जोरदार सराव करताना दिसून येत आहेत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये ७० पेक्षाही अधिक देश सहभाग घेणार आहेत. तर २१५ भारतीय खेळाडू भारताला पदक मिळवून देण्यासाठी दोन हात करताना दिसून येणार आहेत. पी. व्ही. सिंधू, नीरज चोप्रा आणि मनिका बात्रासह अनेक दिग्गज खेळाडू मैदानात आपला जोर दाखवताना दिसून येणार आहेत. चला तर पाहूया, कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक.

बॅडमिंटन : बॅडमिंटनचे सामने २९ जुलै पासून सुरू होणार आहेत. तर ८ ऑगस्ट रोजी अंतिम सामना असणार आहे. हे सामने सायंकाळी ५ वाजल्यापासून खेळवले जातील. पी.व्ही. सिंधू, गायत्री गोपीचंद, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या खेळाडूंवर कोट्यवधी भारतीयांचे लक्ष लागून असणार आहे.

बॉक्सिंग : बॉक्सिंगचे सामने २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. हे सामने रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. तर निकहत जरीन आणि लवलीना बोरेगोहन या खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा असणार आहे.

वेट लिफ्टींग :वेट लिफ्टींगचे सामने ३० जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. हे सामने पहाटे ५ वाजता सामने सुरू होतील. तर टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा हे पदकाचे प्रबळ दावेदार असणार आहेत.

कुस्ती : कुस्तीचे सामने हे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:३० वाजेपासून सुरू होणार आहेत. बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यावर संपूर्ण देशाची नजर असणार आहे.

ॲथलेटिक्स

ॲथलेटिक्सचे सामने ३० जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत खेळवले जातील. सकाळी १० वाजल्यापासून ॲथलेटिक्सचे सामने सुरू होतील. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा, एम श्रीशंकर, हिमा दास, दुती चंद हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

क्रिकेट :भारतीय महिला संघ देखील कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. २९ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने सकाळी ८ वाजता सुरू होतील. भारत आणि पाकिस्तानचा सामना ३१ जुलै रोजी होणार आहे. तर उपांत्य फेरीचे सामने ६ ऑगस्टला आणि अंतिम सामना ७ ऑगस्ट रोजी होईल.

हॉकी : हॉकीचे सामने २९ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान खेळवले जाणार आहेत. भारतीय पुरुष आणि महिला संघासोबतच गटात घाना, इंग्लंड, कॅनडा आणि वेल्सचे संघ आहेत. पुरुष आणि महिलांचे सामने संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहेत.

सायकलिंग : सायकलिंग स्पर्धा २९ जुलैपासून सुरू होणार आहे. भारताकडून १३ खेळाडू या स्पर्धेचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुरुषांमध्ये रोनाल्डो संघाचे नेतृत्व करेल, तर महिला संघाचे नेतृत्व मयुरी करणार आहे.

ज्युडो: ज्युडो या खेळातील सामने १ ते ३ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. भारताने आतापर्यंत ज्युडो या खेळात ३ रौप्य आणि ५ कांस्यपदकाची कमाई केली आहे. असे एकूण भारताकडे ८ पदकं आहेत. सुशीला ही संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून ती यावेळी पदकाचा रंग बदलू शकेल, अशी अपेक्षा आहे. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्यपदक जिंकून तिने इतिहास रचला होता.

स्क्वॉश : स्क्वॉशचे सामने २९ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान खेळवले जातील. यामध्ये भारताने आतापर्यंत एकूण ३ पदके जिंकली आहेत. दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा सातत्याने पदके जिंकत आहेत. हे सामने दुपारी ४:३० वाजता सुरू होतील.

टेबल टेनिस : २९ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टेबल टेनिसचे सामने खेळवले जातील. शरथ कमल, जी साथियान, मनिका बात्रा पुन्हा एकदा चमत्कार करायला तयार आहेत. हे सामने दुपारी २ वाजता सामने सुरू होतील.

सबस्क्राईब करा

* indicates required