computer

एकाचवेळी यूपीएससी आणि क्रिकेटर झालेला अवलियाबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

खेळ आणि अभ्यास हे तसे दोन टोकांच्या गोष्टी समजल्या जातात. आपल्याकडे एखादा मुलगा जास्त खेळत असेल तर हा काही अभ्यास करत नाही असाच समज असतो. पण काही मुले असतातच भन्नाट. मनसोक्त खेळून पण ती अभ्यासात चांगली असतात. भारतात मात्र एकाचवेळी यूपीएससी आणि क्रिकेटर झालेला अवलिया होऊन गेला आहे.

यूपीएससी किंवा क्रिकेटर या दोन्हीपैकी कुठल्याही एका गोष्टीत यश मिळवणे म्हणजे लाखात एखाद्याला शक्य होणारी गोष्ट. मध्य प्रदेशातील अमय खुरसिया यांनी यूपीएससी परिक्षा पास होऊन दाखवली आणि सोबतच ते क्रिकेटर पण होते.

१९७२ साली जन्म झालेले अमय सध्या कस्टम आणि सेंट्रल एक्साईज विभागात कार्यरत आहेत. अमय यांनी वयाच्या १७ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुढे त्यांनी भारताकडून १९९९ साली पेप्सी चषकातून श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यांनी अवघ्या ४५ बॉल्समध्ये ५७ धावांची खेळी केली.

पुढे त्यांचे क्रिकेट करिअर जास्त बहरले नाही. त्यांनी भारतासाठी एकूण १२ सामने खेळले. यात त्यांनी १४९ धावा केल्या. त्यांनी आपला शेवटचा सामनाही श्रीलंकेविरुद्धच खेळला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी भन्नाट कामगिरी केली. ११९ सामन्यांमध्ये त्यांनी ७ हजार धावा केल्या. मात्र आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यांची चुणूक काही दिसून आली नाही.

यूपीएससी पास करत त्यांनी मात्र आपण अभ्यासात पण काही कमी नाही हे सिद्ध करत अधिकारी होऊन दाखवले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required