computer

वीजेच्या वेगानं धावणाऱ्या उसेन बोल्टच्या मुलांची भन्नाट नावं! तो मराठी असता तर काय नावं ठेवली असती?

जगातला सर्वात वेगवान माणूस असलेला उसेन बोल्ट सर्व प्रकारच्या स्पर्धांपासून दूर असला तरी आजही तो मोठा सेलेब्रिटी आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे जगाचे लक्ष लागून असते. नुकताच फादर्स डे होऊन गेला. उसेन बोल्टने फादर्स डेच्या दिवशी आपल्या मुलांसमवेत फोटो सोशल मिडियावर टाकला. या फोटोची मात्र जगभर चांगलीच चर्चा रंगली आहे.

उसेन बोल्टला गेल्यावर्षी मे महिन्यात एक मुलगी झाली होती. मात्र त्याने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोवरून त्याच्या घरात दोन जुळ्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे हे स्पष्ट होत आहे. पण चर्चेचा विषय हा बोल्टला झालेली जुळी मुले नसून त्याने त्यांची ठेवलेली नावे आहेत.

बोल्टच्या पहिल्या मुलीचे नाव त्याने ठेवले होते - 'ऑलिंपिया लाईटनिंग बोल्ट'. या नावावरून गेल्यावर्षी चांगलीच चर्चा रंगली होती. आता त्याला जुळी मुले झाल्यावर त्याने पुन्हा एकदा त्यांना आगळेवेगळे नावे देऊन चर्चेत आणले आहे.

त्याने आपल्या जुळ्या मुलांचे नाव सेंट लिओ बोल्ट आणि थंडर लिओ बोल्ट असे ठेवले आहे. आधी मुलीच्या नावात लाईटनिंग आणि आता मुलाचे नाव थंडर ठेवून या विजेच्या वेगाने धावणाऱ्या धावपटूला विजेवर चांगलेच प्रेम आहे हे दिसून येते. सोशल मिडीयावर मात्र त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. पठ्ठ्याने काहीशी वेगळी नावे ठेवल्यावर त्याला शुभेच्छा पण अनोख्या मिळणे साहजिक आहेत.

उसेन बोल्टच्या नावावर कधीही न मोडू शकणारे विक्रम नोंदवले गेले आहेत. १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही शर्यतीतील तो बादशहा आहे. सलग ३ ऑलिंपिक्समध्ये त्याने तब्बल ८ सुवर्णपदके जिंकली आहेत.

अशा या महान खेळाडूने ठेवलेली नावे तुम्हाला कशी वाटली? 

 

आणखी वाचा: 

इलॉन मस्कच्या मुलाचं नाव पाहून इंटरनेटवर आलीय मीम्सची लाट! असं काय आहे हे नाव?

सबस्क्राईब करा

* indicates required