computer

स्पेनच्या फुटबॉल स्टेडीयमवर एका अंध व्यक्तीचा पुतळा का बसवण्यात आलाय ??

नेहमी असं घडतं की फॅन आपल्या स्टारला श्रद्धांजली देतो. पण आज चक्क एका फॅनला श्रद्धांजली देण्यात आली आहे. स्पेनच्या “वालेन्सिया सी.एफ.” या फुटबॉल क्लबने स्पेनच्या मेस्टाला स्टेडियमवर आपल्या एका फॅनचा पुतळा उभारला आहे. हा फॅन चक्क अंध होता.

मंडळी, या फॅनचं नाव होतं व्हिसेंट अपारिसिओ. व्हिसेंट हा वालेन्सिया सी.एफ. फुटबॉल क्लबचा चाहता होता. तो नियमितपणे फुटबॉल सामने पाहायला यायचा. ४० वर्षापूर्वी त्याला अचानक अंधत्व आलं, पण त्याचं फुटबॉलचं वेड काही कमी झालं नाही. डोळ्यांनी दिसत नसतानाही तो आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी सामने बघायला यायचा.

वालेन्सिया सी.एफ. फुटबॉल क्लबने म्हटलंय की व्हिसेंट मेस्टाला स्टेडियमवर होणाऱ्या प्रत्येक सामन्यासाठी हजर असायचा. त्याची नेहमीची १५ व्या रांगेतील १६४ नंबरची सीट ठरलेली असायची. वालेन्सिया सी.एफ. टीमने आपल्या फॅनला श्रद्धांजली देण्यासाठी याच सीटवर एक ब्राँझचा पुतळा बसवला आहे

व्हिसेंटचा पुतळा बसवण्यासाठी २०१९ वर्ष का निवडलं या मागे पण एक खास कारण आहे. यावर्षी वालेन्सिया सी.एफ. फुटबॉल क्लबला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. आपला १०० वा वाढदिवस त्यांनी सर्वात मोठ्या फॅनला श्रद्धांजली देऊन साजरा केला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required