f
computer

गुगल बद्दल या ७ महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

मित्रांनो, गुगल है तो सब है!! आजकाल गुगलशिवाय आपलं पानही हलत नाही. त्यामुळं गुगलमध्ये काय चालतं, काय नाही याबद्दल लोकांना जाम कुतूहल असतं.  तशा आपल्याला गुगलबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. गुगलला आज जगातली सर्वाधिक यशस्वी कंपनी मानली जाते. जर एक मिनिट गुगल ठप्प झाले तर जगभर हाहाकार माजेल. तशा गुगलबद्दल वरवरच्या गोष्टी सगळ्यांना माहित आहेतच. म्हणजे बघा, ही कंपनी  कुणी स्थापन केली, त्यांचे काम कसे चालते वगैरे वगैरे.. पण गुगलबद्दल आणखीही बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या सहसा सगळ्यांनाच माहित असतात असं नाही. या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर मग जाणून घेऊया गुगलबद्दल काही रोमांचक गोष्टी... 

1) गुगलने ऑफिसात चक्क बकऱ्या नोकरीवर ठेवल्या आहेत.

नाही नाही, त्या काही प्रोग्रॅमिंग करत नाहीत. त्यांचं नेहमीचंच काम करण्यासाठी त्यांना म्हणजे त्यांच्या मालकांना पैसे मिळतात.  तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण गुगल ऑफिसच्या समोरील गवत कापण्यासाठी गवत कापण्याच्या मशीनचा उपयोग केला जात नाही, या कामासाठी त्यांनी दोनशे बकऱ्या भाड्याने घेतलेल्या आहेत. त्यांचं असे म्हणणे आहे की, मशीन वापरून गवत कापण्यामुळे प्रदूषण होईल आणि त्यामुळे ऑफीसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होईल. मंडळी, भारी आहे ना हे? 

2) गुगलची कमाई

गुगल जगातली सर्वात मोठी कंपनी आहे, तर साहजिक आहे त्यांची कमाई पण खूपच असेल.  गुगल कंपनी वर्षाला ५००० करोड रुपये कमावते. त्यांच्या कमाईचे सर्वात मोठे साधन हे गुगल ॲडसेन्स म्हणजे जाहिरातींचं माध्यम आहे.

3) गुगलचं नांव असंच का ठेवलं गेलं आहे?

मंडळी, अनेकांना गुगलचे नाव गुगल का ठेवले आहे याबद्दल उत्सुकता असते. तसा इंग्रजीत गुगल नावाचा शब्दच अस्तित्वात नव्हता.  हा शब्द तयार झालाय तो टायपिंगच्या चुकीमुळे. मूळ शब्द होता गोगुल.  गोगुल गणितात वापरतात. त्याचा अर्थ होतो एकाच्या मागे शंभर शून्य! पण नाव देताना टायपिंग मिस्टेक मुळे गोगुलऐवजी गुगल झाले जे नंतर कंपनीने बदललेच नाही. 
 

4) गुगलच्या अन्य सहायक कंपन्या

गुगलची शॉपिंग लिस्ट लै मोठी आहे.  गुगलने गेल्या १० वर्षात तब्बल १५६ कंपन्या खरेदी केल्या आहेत. गुगलने यूट्यूब, ऍण्ड्रॉइड, लिंकडिन, क्रोम, मोटोरोला यांच्यासारख्या अनेक कंपन्या खरेदी केल्या आहेत.

5) नासामध्ये विमान पार्किंग!!

नासा म्हणजे जगातली लै भारी संस्था आहे. तर ती गुगलच्या हेडक्वार्टरजवळ आहे. त्यामुळे गुगलचे संस्थापक  सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज या दोघांनी तिथले पार्किंग भाड्याने घेतलेय. 

6) गुगलमधील कर्मचारी

गुगलमध्ये जवळपास ५० हजार कर्मचारी काम करतात. अर्थातच, गुगल पगारपण तितकाच भारी देते त्यामुळे  त्यातले कित्येक लोक करोडपती झाले आहेत. 

७. काही अजुन मजेदार गोष्टी!!

गुगलची ४७ देशात ७० ऑफिसेस आहेत. एवढ्या कमी काळात मिळवलेले हे खुप मोठे यश आहे.

दर आठवडयाला गुगलमध्ये जवळपास २०हजार लोक नोकरीसाठी अर्ज करतात. 

गुगल इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. गुगलवर दर सेकंदाला ६० हजारहून अधिक सर्च होतात. 

गुगलच्या होमपेजवर ८८ भाषा वापरता येतात. 

गुगलच्या होमपेजवरील im feeling lucky यावर क्लिक केले की तुम्ही गुगलचे वेगवेगळे डूडल्स पाहू शकता.  

जर एखाद्या गुगल नोकरदाराचा अचानक मृत्यु झाला तर कंपनी पुढच्या दहा वर्षापर्यंत त्याच्या परिवाराला अर्धा पगार देते.

१९९९ साली गुगलने एक्साइट नावाच्या कंपनीला गुगल खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी त्याला नकार दिला होता. 

सबस्क्राईब करा

* indicates required