व्हिडीओ ऑफ दि डे : सिंहीण घेतेय या छाव्याची काळजी, तिला कुणकुणापासून त्याचं रक्षण करावं लागतंय?

प्रातिनिधिक फोटो

आज व्हिडीओ ऑफ दि डे मध्ये आपण बघणार आहोत गीर जंगलातलं एक अनोखं दृश्य. गीर जंगलात एका सिंहिणीने चक्क एका बिबट्याच्या बछड्याला दत्तक घेतलं आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे सिंह बिबट्याच्या पिल्लांचा जीव घेतात, पण हा एक दुर्मिळ प्रकार समोर आला आहे. चला, याबद्दल सविस्तर माहिती घेऊ या...

मंडळी, ६ दिवसांपूर्वी गीर वनविभागाला एक सिंहीण आपल्या दोन पिल्लांसोबत बिबट्याच्या पिल्लाचा सांभाळ करताना दिसली. सिंहिणीने या पिल्लाची स्वतःच्या पिल्लांपेक्षा जास्त काळजी घेतली होती. सिंहाची पिल्लंही आपल्या नवीन भावांसोबत सहज मिसळलेली दिसली. 

वन विभागाने सांगितल्याप्रमाणे बिबट्याचं पिल्लू अवघ्या दीड महिन्याचं आहे. या पिल्लाची त्याच्या आईसोबत कशी ताटातूट झाली याबद्दल माहिती मिळालेली नाही, पण आई नसली तरी त्याला आईप्रमाणेच सुरक्षित ठेवण्याचं काम या सिंहिणीने केलं आहे. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ असल्याचं उप वनसंरक्षक धीरज मित्तल यांनी म्हटलंय. 

मंडळी, सिंहिणीने पिल्लाला आसरा दिला असला तरी इतर सिंह पिल्लाला मारण्यासाठी नक्कीच टपून बसलेले असतील. कदाचित यामुळेच सिंहीण या पिल्लाची एवढी काळजी घेत असावी. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे.

मंडळी, तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका !!

 

 

आणखी वाचा :

व्हिडीओ ऑफ दि डे: एका सिंहाचा हा अंगावर काटा आणणारा लढा लगोलग बघाच!!

हैदराबाद मधला हा दारुडा गेला सिहांशी शेक हँड करायला

व्हिडीओ ऑफ दि डे : चक्क पर्यटकांना मिठ्या मारणारा सिंह बघितलाय का कधी ?

बा अदब! बा मुलाहिजा! होशीयार!! वनराज सिंह आणि कुटुंब रस्ता पार करत आहेत!!

सबस्क्राईब करा

* indicates required