गणेशोत्सव स्पेशल : मानवी चेहरा असलेली जगातली एकमेव गणेश मूर्ती !!

गणपती बाप्पा म्हटलं की डोळ्यासमोर लगेचच गजमुख येतं. हे गजमुख गणेशाला कसं मिळालं याच्या कथा तुम्हाला वेगळ्या सांगायला नको. हे गजमुख म्हणजेच गणेशाची ओळख आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतात असं एक मंदिर आहे जिथे चक्क गणपती बाप्पा त्यांच्या मानवी चेहऱ्यात बघायला मिळतात ? राव ही बातमी व्हॉटसअँप विद्यापीठातून आलेली नाही. अस्सल आणि खरीखुरी आहे.
चला तर आज एका जगावेगळ्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया.
हे मंदिर तमिलनाडुच्या कूटनूर येथे असून मंदिराचं नाव आहे ‘आदि विनायक मंदिर’. या गणेश मूर्तीला मानवी चेहरा असल्याने त्याला 'नर-मुख विनायक' या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या मंदिराबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की पितरांना शांती मिळावी म्हणून येथे रामाने पूजा केली होती. त्यामुळे हे स्थान पितरांना शांती मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
राव, आख्यायिका काहीही असेल पण या मूर्तीला नक्कीच महत्व आहे. जगभरातल गणेशाच्या हजारो मूर्ती आढळतील पण ही त्या सगळ्यात वेगळी ठरते. या मंदिर परिसरातील सरस्वती आणि शंकराचं देऊळही प्रसिद्ध आहे.
आणखी वाचा :
इंडोनेशियाच्या नोटेवर गणपती बाप्पा...यामागचं कारण वाचून तुम्हाला अभिमान वाटेल!!!
हे आहेत इको फ्रेंडली गणेश : यांचातला तुम्ही कोणता बसवणार ?
ड्रोन कॅमेर्याने घेऊयात आठ मिनिटात अष्टविनायक दर्शन...