सोमवारी कामावर जाण्याचा कंटाळा येतो ? जपानकडे यावर एक भन्नाट उपाय आहे !!

मंडळी, शुक्रवार ते रविवार पर्यंतचे दिवस मस्त गेलेले असतात आणि मग सोमवार उगवतो. सोमवारी कामावर जायला अनेकांच्या जीवावर येतं. काहींचा रविवार याच चिंतेत जातो की ‘च्यायला उद्या परत सोमवार आहे, पुन्हा कामावर जावं लागेल’. त्यामानाने शनिवार मस्त जातो. राव, सोमवारची भीती आपल्याच देशात आहे असं नाही बरं का. जगभरच्या कर्मचाऱ्यांना सोमवार भुतासारखा वाटतो.
तर, बातमी अशी आहे की जपानी सरकारने नुकताच सोमवारच्या कामाविषयी एक निर्णय घेतलाय. हा निर्णय असा की कर्मचाऱ्यांनी सोमवारी उशिरा कामाला सुरुवात करायची. म्हणजेच अर्धा दिवस सुट्टी.
जपान मध्ये ‘शायनिंग मंडे’ मोहीम सुरु आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत जपानी सरकारनं देशातील कंपन्यांना आवाहन केलंय की त्यांनी सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांना कामापासून थोडी सूट द्यावी. जपानमध्ये कामाच्या ओझ्यामुळे आत्महत्या होण्याच्या बातम्या आल्या होत्या. या आत्महत्यांना जपानमध्ये ‘कारोशी' म्हणतात. कारोशी जपानमध्ये एक मोठी समस्या आहे.
अशीच एक कल्पना जपानी सरकारने गेल्यावर्षी मांडली होती. त्याचं नाव होतं प्रीमियम फ्रायडे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडावं, जेणेकरून त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. पण ही कल्पना फारशी चालली नाही. त्यामुळेच ‘शायनिंग मंडे’ची नवी आयडिया काढण्यात आली आहे.
तर मंडळी, जपानमध्ये सामान्य कर्मचाऱ्याचं काम आणि त्याच्या जीवनाचा ताळमेळ याकडे बारीक लक्ष दिलं जातं. कारण याचा संबंध थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी व प्रगतीशी आहे.
राव, तुम्हाला काय वाटतं आपल्या देशातही असाच प्रयोग करायला हवा का ? कमेंट बॉक्स मध्ये चर्चा होऊन जाउदे !!
आणखी वाचा :
फक्त एका मुलीसाठी ही रेल्वे इतकी वर्षं का धावली ?
असं काय घडलं की या जपानी अधिकाऱ्याला प्रवाशांची माफी मागावी लागली ?
रास बिहारी बोस या गोष्टीसाठी जपान मध्ये इतके प्रसिद्ध असतील हे सांगूनही पटणार नाही !!
जपानमध्ये रोबोट चालवत आहेत एक पूर्ण हॉटेल..
हिरोशिमा-नागासाकीबद्दलच्या या १० गोष्टी तुम्हांला माहित आहेत का ?