बाबो !! मुंबईच्या लोकल मध्ये शिरला अनोळखी पाहुणा....व्हिडीओ पाहून घ्या राव !!

मंडळी, मुंबईत दररोज अनेक अनोळखी प्रवासी येत असतात. त्यांना लोकलने प्रवास करावा लागतो. असाच एक अनोळखा प्रवासी आज लोकल मधून प्रवास करत होता. पण त्याला बघून मुंबईकरांना प्रचंड घाम फुटला राव. हा प्रवासी होता एक साप.

मंडळी, टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत जाणाऱ्या लोकल मध्ये हा साप आढळून आला. लोकल ठाणे स्टेशनवर थांबली तो पर्यंत सगळं आलबेल होतं. ट्रेन पुढे निघाल्यानंतर एका प्रवाशाने पंख्याकडे बघितलं. तिथे साप बसलेला होता. त्यानंतर त्याने ओरडून सगळ्यांना साप असल्याचं सांगितलं. सापाला बघून डब्यात चांगलीच खळबळ माजली. लोकांनी आरडाओरडा सुरु केला. 

आरडाओरडा झाल्यानंतर ट्रेन थोडावेळ थांबवण्यात आली. एका प्रवाशाने लाकडाने सापाला खाली पाडलं आणि रुळावर फेकून दिलं. यादरम्यान मागच्या लोकल खोळंबल्या होत्या राव. हा प्रवास डब्यातील प्रत्येकालाच आठवणीत राहणार आहे यात शंका नाही.

राव, मुंबईच्या लोकल मध्ये मुंबईकरांना जेमतेम जागा मिळते त्यात हे साप महाराज आल्यावर मुंबईकरांचं कसं होणार ? असो... हे साप म्हणजे कुठेही जाऊन पोहोचू शकतात भौ. गेल्याच महिन्यात मायामीच्या विमानतळावर असाच एक साप आढळला होता. तो एका बॅगेत लपला होता. ही बॅग विमानात पोहोचणार इतक्यात कर्मचाऱ्यांचं त्याकडे लक्ष गेलं. मग कर्मचाऱ्यांनी सापाला ताब्यात घेतलं.  नाही तर या सापाने विमानात हाहाकार उडवला असता.

 

आणखी वाचा :

तिची त्वचा सापासारखी बदलते : वाचा जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या शालिनीची कहाणी...

फक्त पावसाळ्यात दर्शन देणारे ११ भारतीय प्राणी !!

सबस्क्राईब करा

* indicates required