computer

त्याने नकली बंदुकीने मुलीला लुटण्याचा प्रयत्न झाला. पण....पुढे काय झालं बघा...!!

राव, अतिआत्मविश्वास कसा नडतो त्याचा हा किस्सा. ब्राझीलच्या चोराने एका मुलीला नकली बंदुकीने लुटण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्या मुलीला गृहीत धरून फार मोठी चूक केली होती. चला हा पूर्ण किस्सा वाचूया!!

तर त्याचं झालं असं, ब्राझीलच्या रिओ-दे-जिनेरिओमध्ये रात्री एक मुलगी टॅक्सीची वाट बघत उभी होती. तिला एकटं बघून एक चोर तिच्याजवळ आला आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्याकडून मोबाईल मागू लागला. खरं तर त्याच्याकडे कोणतीही बंदूक नव्हती. त्याच्याजवळ बंदुकीच्या आकाराचा पुठ्ठा होता. तर, या चोराला वाटलं की मुलगी एकटी आहे, घाबरून लगेच मोबाईल देईल. पण त्याला हे माहित नव्हतं की ती मुलगी कोणी साधीसुधी मुलगी नाही!!

मंडळी, ती मुलगी होती UFC (Ultimate Fighting Championship) फायटर ‘पोलयाना व्हीआना’. तिने या चोराची एका झटक्यात गचांडी धरली. आणि बुक्क्यांच्या प्रसादाने त्याला जन्माची अद्दल घडवली. मग तिने पोलिसांना बोलावून चोराला त्यांच्या ताब्यात दिलं. पोलीस येईपर्यंत तिने त्याला जागचं हलूसुद्धा दिलं नव्हतं.

(त्याची बंदूक)

तर मंडळी, अशा प्रकारे एका रस्त्यावरच्या साध्या चोराला UFC फायटरला भेटण्याची संधी मिळाली, पण वेळ चुकीची होती भौ !!

 

 

आणखी वाचा :

गाडी चोर गाडीतच अडकला...वाचा पुढे काय झाले !!

हा चोर या कारणामुळं फक्त मंगळवारी चोरी करतो...

भागते चोर की चड्डी ! हा...हा...हा...!!!