सिंगल,डबल नव्हे तर चक्क षटकार मारून या फलंदाजांनी सुरू केलीये आपली कसोटी कारकीर्द, पाहा यादी..

क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली तेव्हापासून कसोटी क्रिकेट खेळले जात आहे. पहिला अधिकृत कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये मेलबर्नच्या मैदानावर रंगला होता. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्नं असतं की एकदा तरी पांढऱ्या रंगाची जर्सी घालून आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळावं. या फॉरमॅटमध्ये फलंदाजाचे कौशल्य दिसून येत असते. जो कसोटीत हिट झाला तो फलंदाज वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये देखील आपला डंका वाजवू शकतो. या लेखातून आम्ही तुम्हाला ५ अशा फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात षटकार मारून केली आहे.

) सुनील ॲंब्रिस (Sunil Ambris) : 

वेस्ट इंडिज संघासाठी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सुनील ॲंब्रिसने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात षटकार मारून केली होती. २०१७ मध्ये वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू होती. या मालिकेतून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान दुसऱ्या डावात त्याने गगनचुंबी षटकार मारत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

) डेल रिचर्ड्स (Dale Richard's) :

या यादीत दुसऱ्या स्थानी वेस्ट इंडिज संघातील फलंदाज डेल रिचर्ड्स आहे. २००९ मध्ये बांगलादेश संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर आला होता. बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना त्याने पदार्पण केले आणि पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.

) धनंजय डी सिल्वा (Dhananjay de Silva) :

या यादीत तिसऱ्या स्थानी आहे, श्रीलंकेचा विस्फोटक फलंदाज धनंजय डी सिल्वा. श्रीलंका संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या धनंजय डी सिल्वाला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. २०१६ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने षटकार मारत आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती.

) कमरुल इस्लाम (Kamrul Islam ) :

बांगलादेश संघातील फलंदाज कमरुल इस्लाम या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याला २०१६ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या संधीचा लाभ घेत त्याने पदार्पणाच्या सामन्यात षटकार मारून आपलं धावांचं खातं उघडलं होतं.

) रिषभ पंत ( Rishabh pant) : 

 या यादीत पाचव्या स्थानी आहे, भारतीय संघातील डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज रिषभ पंत. पंतची खासियत म्हणजे तो कसोटी क्रिकेट वनडे आणि टी -२० क्रिकेट प्रमाणेच खेळतो. त्याच्या खेळात आक्रमकता कायम असते. २०१८ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध पदार्पण करताना त्याने षटकार मारून आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. 

काय वाटतं, कसोटी क्रिकेटमध्ये कुठला असा आक्रमक फलंदाज असेल जो एकाच षटकात सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम करेल. कमेंट करून नक्की कळवा..

सबस्क्राईब करा

* indicates required