केवळ स्विमिंग मुळेच नव्हे तर 'या' कारणामुळे देखील वेदांत माधवन जगासमोर ठरतोय आदर्श

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर, वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये एक नाव प्रचंड चर्चेत होते, ते म्हणजे आर्यन खान. ओळख सांगायची झाली तर, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा. क्रुझवर झालेल्या पार्टीत आर्यन खान आमली पदार्थांचे सेवन करताना दिसून आला होता. याच प्रकरणात त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. या प्रकरणानंतर अनेकांना कळलं की आर्यन खान आहे तरी कोण. एकीकडे सिनेसृष्टीतील किंग खान असलेल्या शाहरुख खानचा मुलगा अशा प्रकरणात अडकतोय. तर दुसरीकडे आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात व्यस्त आहे. दरम्यान त्याने एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (Vedant madhavan)

बॉलिवूडचा इतिहास पाहिला तर, कलाकारांची मुलं देखील पुढे जाऊन बॉलिवूडमध्ये आपलं करियर करत असतात. हा वारसा वर्षानुवर्षे सुरूच आहे. ज्यात ऋतिक रोशन, टायगर श्रॉफ, वरून धवन, रणवीर कपूर यांसारख्या अभिनेत्यांचा समावेश आहे. तर मोजकेच परंतु हिट चित्रपट देणाऱ्या, आर माधवनच्या (R madhavan) मुलाने वेगळाच मार्ग निवडला आहे. आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा एक जलतरणपटू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पदक मिळवून दिले आहे.

काय म्हणाला वेदांत माधवन?

वेदांतने डीडी इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “मला माझ्या वडिलांच्या सावलीत राहायचे नाहीये. मला माझी वेगळी ओळख निर्माण करायची आहे. मला फक्त आर माधवनचा मुलगा अशी ओळख नको आहे." वेदांतला स्विमिंगवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी माधवन कुटुंबाने दुबई येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता.

वेदांतने कोपेनहेगन येथे झालेल्या डॅनिश ओपन स्पर्धेत भारताला पदक मिळवून दिले होते. त्याने ८०० मीटर प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर १५०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. तसेच २०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात त्याने आपल्या वेळेत भरपूर सुधारणा केली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required