computer

गावस्कर कधी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? तुमचं उत्तर हमखास चुकेल पाहा !!

लिटल मास्टर सुनील गावस्कर हा मुंबई आणि महाराष्ट्राने भारतीय क्रिकेटला दिलेला अनमोल हिरा आहे. भारताने पहिल्यांदा १९८३ साली वनडे वर्ल्डकप जिंकला त्यात सुनील गावस्करचा सिंहाचा वाटा होता. आज जरी सचिन आणि कोहलीसारख्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले असले तरी तो काळ गाजवला फक्त सनी म्हणजेच सुनील गावस्कर याने.

सुनील गावस्करचं आज वय आहे ७२ वर्षं. १९७१ ते १९८७ या काळात त्याने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम केले. टेस्ट क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा पल्ला गाठणारा तो पहिला खेळाडू होता. तसेच महान खेळाडू डॉन ब्रॅडमन यांचा २९ शतकांचा विक्रम मोडणारा पण हाच पठ्ठ्या होता.

टेस्ट क्रिकेटमध्ये १०१२२ धावा आणि ३०९२ वनडे धावा करत स्वतःची दमदार छाप त्याने सोडली आहे. असा हा खऱ्या अर्थाने महान असलेला खेळाडू नेमका निवृत्त कधी झाला याबद्दल अनेकांना प्रश्न आहे. त्याला हाच प्रश्न एका मुलाखतीत विचारला गेला तेव्हा त्याने दिलेले उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

सुनील गावस्कर आजही निवृत्त झालेला नाही. नोव्हेंबर १९८७ साली त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यामागील गोष्ट स्वतः लिटलमास्टरने सांगितली आहे. १९८७ साली इंग्लंड येथील लॉर्ड्सवर एक प्रथम श्रेणी सामना खेळत असताना तो ८०-८५ धावांवर नाबाद राहिला होता.

यावेळी त्याला पत्रकारांनी विचारले की लॉर्ड्सवर शतक करण्याचे महत्व तुझ्यासाठी काय आहे. त्यावर गावस्कर उत्तरला की," हा आपला शेवटचा सामना असल्याने जागा महत्वाची नव्हती, तर शतक करणे महत्वाचे होते." या वाक्यावरून लोकांनी गावस्करने निवृत्ती घेतली असा समज करुन घेतला."

गावस्कर म्हणतो की, "आपण आजही निवृत्ती घेतलेली नाही. तुम्ही बीसीसीआयला देखील याबद्दल विचारू शकता. त्यावेळी आपण निवड समितीला सांगितले होते की आपण काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार आहोत. पण काही दिवसांचा अर्थ कायमस्वरूपी असा होत नाही."

आजही गावस्करने निवृत्तीचे अधिकृत पत्र बीसीसीआयला दिलेले नाही. १९८७ पासून आजपर्यंत गावस्कर क्रिकेटसोबत जोडलेला आहे. आज एक भन्नाट कॉमेंटेटर म्हणून जगात प्रसिद्ध आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required