computer

बॉक्सिंगमध्ये दोन कांस्यपदके का दिली जातात?? बॉक्सिंगबद्दल ही गोष्ट माहीत आहे का?

बॉक्सिंग हा तसा सर्वाधिक चित्तथरारक खेळांपैकी एक समजला जातो. यात असणारी मुक्केबाजी, सेकंदागणिक होणारी चढाओढ ही बॉक्सिंग पाहण्याचा आनंद द्विगुणित करणारी असते.
मात्र बॉक्सिंगमध्ये  दोन कांस्यपदके दिली जातात हे तुम्हाला माहिती आहे का?

याच कारणांनी मेरी कोम आणि विजेन्द्र सिंग यांनी अनुक्रमे २०१२ आणि २००८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सुवर्णपदक आणि रौप्यपदक जसे एकाच विजेत्या खेळाडूला दिले जाते, तसे कांस्यपदकचे नाही.

बॉक्सिंगमध्ये पहिल्या दोन विजेत्यांना सुवर्ण आणि रौप्यपदक मिळते, तर सेमी फायनल हरलेल्यांमध्ये कांस्यपदकासाठी प्लेऑफ सामना होत असतो. थोडं मागे गेले तर हे प्रकरण समजायला तुम्हाला मदत होईल.

इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने १९५० साली नियम बदलत कांस्यपदकासाठी होणारा सामना रद्द केला. सेमी फायनलमध्ये हरणाऱ्या दोन्ही खेळाडूंना पदक न देता तिसऱ्या स्थानी असल्याचे घोषित करण्यात आले. याच कारणाने १९५२ साली कांस्यपदकासाठी सामना घेण्यात आला नाही. सेमी फायनल हरलेल्या खेळाडूंना ऑलिंपिक डिप्लोमा देण्यात आला.

हे असेच १९६८ सालच्या मेक्सिको ऑलिंपिक्सपर्यंत सुरू होते. १९७० साली ऑलिम्पिक कमिटीने सेमी फायनल हरलेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक देण्याचा प्रस्ताव पार केला. तेव्हापासून आजवर दोन खेळाडूंना हे कांस्यपदक दिले जात आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required