आईन्स्टाईन तात्यांच्या सिद्धांताला धक्का !! अंधार प्रकाशापेक्षा जास्त गतीने प्रवास करतो ?

आपले आईन्स्टाईन तात्या म्हणून गेलेत की प्रकाशापेक्षा जलद कोणतीही गोष्ट या ब्रह्मांडात नाही. अपवाद फक्त धोनीची स्टम्पिंग आणि आईच्या चपलेचा आहे. तर आज आम्ही या सिद्धांताला धक्का न लावता  एक मजेशीर गोष्ट सांगणार आहोत.

प्रकाशापेक्षा अंधार जास्त गतीने पसरतो !! हे विधान एखाद्या कादंबरीतलं वाटू शकतं, पण जरा विचार करा. आता उदाहरणच देतो. पण थोडं डोकं खाजवावं लागेल.

समजा तुमच्याकडे संपूर्ण चंद्र उजळवून टाकणाऱ्या प्रकाशाचं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाने तुम्ही संपूर्ण चंद्र एका फटक्यात उजळवू शकता. जेव्हा तुम्ही चंद्रावर हा प्रकाश पाडता आणि हा प्रकाश जिथून जाणार आहे त्या मार्गात अडथळा निर्माण करता, तेव्हा प्रकाशापेक्षाही जास्त गतीने तिथे अंधार पसरेल. नाही का ?

प्रकाशाची गती असते तब्बल २.९९.३३८ किलोमीटर प्रती सेकंद असते. आणि या प्रकाशात अडथळा आला की त्याहीपेक्षा जास्त गतीने तिथे अंधार पसरतो. म्हणजे प्रकाशापेक्षा अंधार नाही का जास्त जलद प्रवास करत ? हा प्रयोग घरच्या टॉर्चवरही करता येईल राव. यासाठी चंद्रावर प्रकाश पडण्याची गरज नाही.

आता महत्वाचं म्हणजे हा काही सिद्धांत नव्हे. आपण आईन्स्टाईन तात्यांना खोटं ठरवणार नाही. ते म्हणतात की  जिथे फोटॉन किंवा प्रकाशाचा कण नाही तिथे अंधार आहे. म्हणजे अंधार असणं म्हणजे तिथे काहीच नसणं. अंधार हा वैज्ञानिकांना पडलेलं आणखी एक कोडं आहे ? आहे ना डोक्याला शॉट ?

तुम्हीच विचार करा विज्ञान किती कमालीच्या गोष्टीने भरलेलं आहे. विज्ञानाचे असेच गमतीदार किस्से वाचण्यासाठी आमचे हे ही लेख एकदा बघून घ्या राव :

आपला डोळा किती मेगापिक्सल असतो ?? माहित आहे का भाऊ !!

या 3 प्रयोगातून तुम्ही तुमच्या स्वप्नांना कंट्रोल करू शकता राव !!

हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत....या सिम्पल ट्रिकने फक्त १० सेकंदात हात स्वच्छ होतील !!

फळांवर फवारणी केलेले किटकनाशक घालवायचा हा सर्वोत्तम उपाय आहे !!

कापड्यांवरचे डाग घामाचे नाहीत बरं...जाणून घ्या कशाने हे डाग पडतात आणि ते काढायचे कसे!!

म्हणून नवीन माणसाचा चेहरा लक्षात राहातो, नाव नाही....

सूर्य अदृश्य झाला तर काय होईल भाऊ?

सबस्क्राईब करा

* indicates required