computer

फ्रांड्स सिंगल आहात ? मग ‘चाय पिलो’...व्हॅलेंटाइन डे ला सिंगल लोकांना मिळणार फ्री चहा !!

व्हॅलेंटाइन जवळ येतोय पण तुमचं सिंगलत्व (सिंगल असण्याची अवस्था) अजून संपत नाहीये का ? पण यांची काळजी कोणाला आहे भाऊ ? १४ तारखेला सगळं लक्ष कपल्सवर असणार. सिंगल लोकांना विचारतोय कोण ? पण असं नाहीय हा. गुजरातचा एक चहावाला आहे ज्याला सिंगल लोकांची खूप काळजी आहे. हा चहावाला १४ तारखेला केवळ सिंगल लोकांना मोफत चहा वाटप करणार आहे.

चहाच्या दिवाण्या लोकांनी इकडे लक्ष द्या !!

या चहा दुकानाचं नाव आहे “MBA चायवाला”. नावावरूनच अंदाज आला असेल की हे दुकान कोणाचं आहे. हे चहाचं दुकान चालवणारा प्रफुल बिल्लोरे हा एक MBA चा विद्यार्थी आहे. MBA मध्येच सोडून त्याने चहाचा व्यवसाय सुरु केला.

तर, प्रफुल बिल्लोरेने सिंगल लोकांचं दुःख कमी करण्यासाठी एक झक्कास आयडिया शोधून काढली आहे. तो म्हणतो की हा दिवस सिंगल लोकांनी पण साजरा केला पाहिजे. काही लोक ‘हक से सिंगल’ असतात. सिंगल असण्यात वाईट काहीच नाही. १४ तारखेला सगळे कपल्स लोकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवतील, पण सिंगल लोकांचं काय ? हाच मुद्दा लक्षात घेऊन त्याने १४ तारखेला सिंगल लोकांना चहा पार्टी देऊ केली आहे. संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत कोणीही सिंगल व्यक्ती मोफत चहा प्यायला या दुकानावर येऊ शकते.

यासाठी प्रफुलने फेसबुकवर इव्हेंट तयार केलाय. या इव्हेंटच्या माध्यामातून त्याने सिंगल लोकांना आमंत्रण दिलंय. त्याची ही झक्कास आयडिया सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मंडळी, प्रफुलची आजवरची कथा प्रत्येक तरुणाने वाचण्यासारखी आहे. प्रफुलने MBA चा अभ्यास मध्येच सोडला. त्याला भारतातल्या एका अग्रगण्य बिझनस कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा होता. पण तो काही जमून आला नाही. मग त्याने चहाचं दुकान सुरु करायचं ठरवलं. या निर्णयाला त्याच्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी प्रचंड विरोध केला. पण या विरोधाला न जुमानता त्याने २०१७ साली अहमदाबादच्या वस्त्रपूर भागात स्वतःच्या हिमतीने चहाचं दुकान सुरु केलं. त्यावेळी त्याच्याकडे केवळ ८,००० रुपये भांडवल होतं.

वर्षभरात त्याच्या चहाचा व्यवसाय धावू लागला. त्याने मग चहा सोबत खाद्यपदार्थ विकायला सुरुवात केली. व्यवसायात जम बसल्यानंतर तो आता हा व्यवसाय वेगळ्या ढंगाने वाढवत आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने त्याने शोधून काढलेली कल्पनाच बघा ना. या कल्पनेच्या लोकप्रियतेने त्याच्या ग्राहकांमध्ये नक्कीच वाढ होईल.

तर मंडळी, मुद्दा असा आहे की सिंगल लोकांचा पण या जगात कैवारी आहे. तुमचा कोणी सिंगल मित्र आहे का ? असेल तर त्याला tag करा किंवा ही बातमी शेअर करा. तुम्हाला त्याचे नक्कीच आशीर्वाद मिळतील भाऊ !!

 

 

आणखी वाचा :

डिग्रीनं नोकरी नाही, पण अस्सा बिझनेस दिला ना राव !!

पाकिस्तानी चहावाला आणि नेपाळी भाजीवाली  : दोघांच्यावर झालंय इंटरनेट फिदा!! 

अमेरिकेची चायवाली : 'देसी' चहा विकून तिने कमावले तब्बल २२७ कोटी !!

चहाला  'टी किंवा 'चा' या दोन नावांनीच का ओळखतात? वाचा चहाच्या इतिहासाची गोष्ट!!

सबस्क्राईब करा

* indicates required