अॅॅडमिनदादा आणि ताई, सावधान ! तुमच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये आता येणार आहे पोलिसमामा !!

तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये आता एक पोलीस मामा येणारे भौ. तुमच्या प्रत्येक मेसजवर आता कायद्याची नजर राहणार आहे. 

त्याचं काय आहे ना, महाराष्ट्र पोलिसांकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १,५०,००० पेक्षा जास्त आणि मुंबईतील ५०,००० पोलिसांना व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्स मध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस कर्मचारी जास्तीत जास्त ग्रुप्स मध्ये सामील होऊन मेसेजेसवर करडी नजर ठेवणार आहे. आता जो कोणी अफवा पसरवताना दिसला त्याच्यावर पोलिसांचा जावई होण्याची वेळ येईल.

राव, महाराष्ट्र पोलिसांनी या अफवांच्या विरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. आता खालील पत्रच बघा ना. 

या पत्रात परभणी शहरातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनना नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अफवा कोणत्याही प्रकारची असो चुकीला माफी मिळणार नाही भौ.

हे प्रकरण सध्या बरच गंभीर झालं आहे. सध्या मुलं पळवणाऱ्या टोळीवरून व्हॉट्सअॅपवर अनेक मेसेज फिरत आहेत. या मेसेजमुळे आत्तापर्यंत ७ जणांची हत्या करण्यात आली आहे तर १६ जण जखमी झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता फॉरवर्ड करण्यात येणाऱ्या मेसजचा हा परिणाम आहे.  

स्रोत

राव, आता ग्रुप मध्ये पोलीस आहेत म्हटल्यावर पोरं कशी गप गुमानं नको ते फॉरवर्ड केलेले मेसेज पाठवणार नाहीत. पण हे कुठवर राव ? आपली पोरं लय हुशार हायत, नवीन ग्रुप बनवून मोकळे होतील. तेव्हा काय करणार ?

 

आणखी वाचा :

फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्विटर वापरण्यासाठी लागणार टॅक्स ??...पाहा बरं कोणत्या देशात आहे हा कायदा !!

नवरीच्या नावाने नवऱ्याला केलं बेजार....काय आहे ते नाव, पाहा बरं !!

आता व्हॉट्सअॅपवरच्या डिलीट केलेल्या फाईल्सही पुन्हा मिळवा...

व्हॉट्सअॅप हँग करणारा मेसेज आलाय ? फिकीर नॉट, हे आहे त्यामागचं साधं कारण...

तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता ते आता फेसबुकला कळणार, हे टाळण्याचा एक उपाय आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required