२०१९ मधले बोभाटाच्या वाचकांना आवडलेले १० लेख!! तुम्हांला आमचा कोणता लेख सर्वात जास्त आवडला?

२०१९ वर्षात बोभाटाला वाचकांनी मोठ्याप्रमाणात प्रतिसाद दिला. जशी शाबासकी दिली तशी टीका केली, सूचना केल्या, प्रसंगी आमच्या माहितीत भर घातली.आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्ही २०१९ वर्षातील गाजलेले १० लेख तुमच्यासमोर ठेवत आहोत. यातला तुम्हाला आवडलेला किंवा अगदी न आवडलेला लेखही तुम्ही नक्की सांगा !!
१. लाखो रुपये लुटून जाता जाता चोरांनी आरशावर काय लिहिलंय पाहा....

हा फोटो बिहारची राजधानी पटना येथील हनुमान नगरच्या एका घरातला आहे. या घरात स्थानिक व्यावसायिक प्रवीण त्याच्या पत्नी सोबत राहतो. त्याच्या घरातल्या आरशावर लिहीलंय “भाभीजी बहुत अच्छी हैं।” आणि खाली भाभीच्या नवऱ्याबद्दल म्हणजे प्रवीणबद्दल शिव्यांची लाखोली वाहिली आहे. या फोटो मागची गोष्ट आज जाणून घेऊया.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/lifestyle/bihar-thieves-writes-bhabhi-ji-bahut-aachi-hai-mirror-3411
२. बच्चन काकांच्या जलसातले हे १० फोटो पाह्यले का ?

पहिल्यांदा मुंबईला गेले की मुंबई दर्शन हे ठरलेलेच असते. त्यात मुख्य आकर्षण असते ते रविवारी आपल्या जलसा या घरासमोर उभे राहून चाहत्यांना दर्शन देणाऱ्या अमिताभ बच्चनचे!! अनेक लोक तासंतास अमिताभला बघायला मिळेल म्हणून जलसाच्या बाहेर उभे असतात. बिग बी पण सहसा चाहत्यांना निराश करत नाही. वेळ काढून तो त्याचा चाहत्यांना अभिवादन करायला बाहेर येतोच.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/lifestyle/amitabh-bachchan-house-jalsa-inside-pictures-3220
३. या १५ फोटोंतलं टायमिंग तुम्हाला विचार करायला नक्की भाग पाडेल!!

मंडळी, परफेक्ट टायमिंग असलेले फोटो आम्ही तुम्हाला या पूर्वी पण दाखवले आहेत. आज जे फोटो आम्ही घेऊन आलो आहोत ते मात्र डोक्याला शॉक देणारे आहेत. या फोटोमध्ये साधलेला परफेक्ट टाईम तुम्हाला फोटो पुन्हा पुन्हा बघायला भाग पाडेल.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
४. हे गाव वर्षातून एकदाच पाण्याबाहेर येतं ? काय आहे या गावाचं रहस्य ?

गोवा म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र, दारु आणि कमी कपड्यांतल्या फिरंगी बायका!! गोव्याचा समुद्र किनारा म्हणजे भारतातला सगळ्यात जास्त लोकप्रिय सर्वात जास्त समुद्र किनारा असेल. अर्थात त्याचे कारण म्हणजे गोव्यात प्रत्येक गोष्टीसाठी असलेले स्वातंत्र्य आहे!! गोवा आपल्या महाराष्ट्राला इतका जवळ आहे की तुम्ही आतापर्यंत तिथे किमान एकदा जाऊन आला असाल आणि गेला नसाल तर हजारो वेळा मनोमन तिकडे जाण्याचे प्लॅन्स तर नक्कीच केले असतील. पण जे गोवा फिरून आलेत आणि ज्यांचे फिरायचे राहिले आहे अशा तमाम जनतेला माहित नसेल अशी गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/lifestyle/underwater-indian-village-curdi-3028
५. साप चावल्यानंतर काय करावे ? या ७ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !!

साप चावला की माणूस भीतीनेच अर्धा मरतो. मग काही कधी वाचलेले-ऐकलेले प्रथमोपचार आठवतात आणि आपण माणूस वाचवायचा प्रयत्न करतो. ही वेळ तशी कधी सांगून येत नाही. म्हणूनच आज बोभाटा सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करु नये याची माहिती घेऊन आलं आहे. या साध्यासोप्या ७ गोष्टी लक्षात ठेवल्या, तर आपलं आणि अशा अडचणीत सापडलेल्यांचं आयुष्य थोडं सुखकर होईल..
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/health/what-should-you-do-if-youre-bitten-snake-3425
६. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात या ७ उद्योगांना लागेल कुलूप!!
टेक्नोलॉजीची पहिली झळ पोहोचली १९९८ साली कोडॅक कंपनीला. या कंपनीत तेव्हा २ लाख लोक नोकरी करत होते आणि जगातला ८५% फोटोग्राफीचा पेपर ही कंपनी पुरवत होती. पण थोड्याच दिवसात डिजिटल कॅमेरा आला आणि पुढच्या काही वर्षात कोडॅकला टाळं लागलं. येणारे टेक्नोलॉजीची वादळ अनेक कंपन्यांना उध्वस्त करून जाणार आहे. आज आपण बघूया ऑटोमोबाईलचा उद्योग कसा बदलणार आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/lifestyle/present-auto-sector-will-go-bankrupt-soon-3298
७. दुबईच्या शेखांच्या श्रीमंतीचे काही नमुने- नमुने असे तर आख्खा देश कसा असेल??

दुबई हे एक मोठं मार्केट आहे, शिवाय तिथल्या जमिनीखाली तेलाच्या विहिरी आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पण दुबईत तेल मिळालं ते ५० वर्षापूर्वी. १९३० पर्यंत दुबईची पर्ल इंडस्ट्री म्हणजे दुबईच्या मोती व्यवसायावर दुबई उभी होती. दुबईच्या नशिबाने तिथे तेलाच्या विहिरी सापडल्या. मोतींचा व्यापार कमी झाला असला तरी तेलामुळे तिथल्या श्रीमंतीला धक्का लागला नाही. याला आणखी हातभार लागला तो तिथल्या पर्यटनामुळे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
८. दुबईच्या शेखांच्या श्रीमंतीचे काही नमुने- नमुने असे तर आख्खा देश कसा असेल??
दुबई हे एक मोठं मार्केट आहे, शिवाय तिथल्या जमिनीखाली तेलाच्या विहिरी आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पण दुबईत तेल मिळालं ते ५० वर्षापूर्वी. १९३० पर्यंत दुबईची पर्ल इंडस्ट्री म्हणजे दुबईच्या मोती व्यवसायावर दुबई उभी होती. दुबईच्या नशिबाने तिथे तेलाच्या विहिरी सापडल्या. मोतींचा व्यापार कमी झाला असला तरी तेलामुळे तिथल्या श्रीमंतीला धक्का लागला नाही. याला आणखी हातभार लागला तो तिथल्या पर्यटनामुळे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
९. या बाईने लैंगिक स्वैराचार केला, पण त्यामुळे विवाहित स्त्रियांवरचे स्वैराचाराचे खटले का थांबले?
आपला इतिहास नेहेमीच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो किंवा प्रेरणादायक इतिहासच आपल्या नजरेस आणून दिला जातो. इतिहासाची काही पानं अशी पण असतात जी काही वेळा आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावतात आणि आपल्या मनाला प्रश्न विचारायला लावतात की आमचे पूर्वज असेही वागत होते ????
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
१०. फोटो स्टोरी : बोअरवेलमध्ये पडलेला प्रिन्स सध्या काय करतो ?
जुलै २००६ सालच्या एका घटनेने आपल्या सगळ्यांना २४ तासांसाठी टीव्ही समोर बसवून ठेवलं होतं. त्या घटनेतला हा फोटो आहे. काही आठवलं का ? आठवत नसेल तर आम्हीच सांगतो. हा आहे प्रिन्स. हो तोच मुलगा जो बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सैनाला बोलावण्यात आलं होतं. या घटनेला आता १३ वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्या फोटो स्टोरीमध्ये आपण हा प्रिन्स सध्या काय करतो ते पाहणार आहोत.
पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
https://www.bobhata.com/lifestyle/13-years-prince-rescue-mission-3417