computer

४००किमी उंच आकाशातून ज्वालामुखी कसा दिसतो पाहायचाय? पाहाच मग इथे!!

ज्वालामुखी हा सर्वांसाठी मोठा कुतूहलाचा विषय आहे. ज्वालामुखीचा स्फोट, त्याचे तयार होणे, ज्वालामुखी पासून निघणारा लाव्हारस या सर्व गोष्टी माणसाला चकित करत असतात. आज आम्ही याच साखळीतील थोडी वेगळी गोष्ट सांगणार आहोत. हाच ज्वालामुखी आकाशातून कसा दिसत असेल?

आयएसएसमधल्या काही अंतराळवीरांनी जपानच्या कुरील आयलँड येथे असलेल्या सारीचेव ज्वालामुखीचे आकाशातून फोटो काढले आहेत. या फोटोंची मालिका जवळपास ११ वर्षं आधी २००९ साली काढली गेली होती. हा ज्वालामुखी शिखर कुरील आयलँड साखळीतील सर्वात जास्त जागृत समजला जातो.

नासाच्या म्हणण्यानुसार या ज्वालामुखीचा हा विस्तृत फोटो ज्वालामुखीतज्ञांना मोठी मदत करणारा ठरू शकतो. या फोटोत स्फोट होण्याच्या बरोबर सुरुवातीचा काळ कैद झालेला दिसेल. या फोटोत तपकिरी राख आणि पांढरी वाफ दिसते.

नासाने केलेल्या दाव्यानुसार वरच्या बाजूला दिसणारा गुळगुळीत पांढरा भाग हा पाण्याच्या संक्षेपणामुळे(कंडेनसेशन) असू शकतो. त्यामुळे राखेच्या वरील हवेतील भाग हा वेगाने थंड होतो. याला पिलीयस क्लाउड म्हटले गेले आहे. याचबरोबर तुम्ही करड्या रंगाचे राखेचे ढग पाहू शकता. हा ढग ज्वालामुखीच्या ग्राऊंड ते कळस असा चढत्या क्रमात दिसेल.

तर मग या आगळावेगळा आकाशातील ज्वालामुखीचा फोटो पाहून तुम्हाला काय वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

सोबत हे ही वाचा.

धगधगता ज्वालामुखीचे हे भन्नाट फोटो पाहिले असतील तर आता त्या मागची गोष्ट पण वाचून घ्या!!

 

अझरबैजानमध्ये गॅस आणि तेल भांडाराला लागलेल्या आगीला ज्वालामुखी कारणीभूत कसा? काय आहे हे प्रकरण?

 

हिरव्या रंगाची उल्का ज्वालामुखीमध्ये पडतानाच्या परफेक्ट फोटोची कथा!!

 

ज्वालामुखीचा स्फोट कधी एवढ्या जवळून पाहिलाय का? व्हिडीओ पाहून घ्या !!

 

बेटावर तलाव, तलावात ज्वालामुखी, ज्वालामुखीत तलाव, तलावात बेट...डोकं चक्राऊन सोडणारं हे ठिकाण आहे कुठे ?

 

हिरव्या रंगाची उल्का ज्वालामुखीमध्ये पडतानाच्या परफेक्ट फोटोची कथा!!


भेटा अमेरिकन सावित्रीला....ज्वालामुखीत पडलेल्या नवऱ्याला तिने मृत्युच्या दाढेतून खेचून आणलं!! 

भेटा अमेरिकन सावित्रीला....ज्वालामुखीत पडलेल्या नवऱ्याला तिने मृत्युच्या दाढेतून खेचून आणलं!!

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required